Home अहमदनगर अहमदनगर: आमदाराला १ कोटींची खंडणीची केली मागणी, दोघांना अटक

अहमदनगर: आमदाराला १ कोटींची खंडणीची केली मागणी, दोघांना अटक

Breaking News | Ahmednagar: अश्लील व्हिडीओ असल्याचे सांगून दिली धमकी, एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी नगरमधील दोघांना अटक.

Demanded 1 crore extortion to MLA, two arrested

अहमदनगर: आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे (६९, रा. आष्टी) यांना एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी नगरमधील दोघांना अटक करण्यात आली आहे. कोतवाली पोलिसांनी ही कारवाई करून त्यांना जिल्हा सत्र न्यायालयापुढे हजर केले असता १ जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेमुळे बीड आणि अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एक तथाकथित पत्रकार व एका महिलेला अटक करण्यात आली आहे. या घटनेत माजी आमदार धोंडे यांच्या स्वीय सहायकाने तथाकथित पत्रकाराला 25 हजार रुपये दिले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी २०२४ ते २६ जून २०२४ या काळात आरोपी कल्पना सुधीर गायकवाड (रा. नगर), महिला आरोपी बांगर (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) व इस्माईल दर्यानी उर्फ भैय्या बॉक्सर (रा. नगर) या तिघांनी संगनमत करुन फिर्यादी भीमराव धोंडे यांना तुमची अश्लील व्हिडीओ क्लिप आमच्याकडे आहे. ती सोशल मीडियावर प्रसारित करून तुमची बदनामी करण्यात येईल, अशी धमकी दिली.

तसेच तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू व तुमची राजकीय कारकीर्द संपवून टाकू, अशी धमकी देऊन फिर्यादीकडे एक कोटी रुपये खंडणीची मागणी केली. यानंतर भीमराव धोंडे यांचे स्विय सहायक जफर शेख यांच्याकडून आरोपी भैय्या बॉक्सर याने २५ हजार रुपये घेतले. आरोपींनी आणखी पैशाची मागणी केल्यानंतर शनिवारी (दि.२९) कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व सहयाक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी दोघांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे करत आहेत.

Web Title: Demanded 1 crore extortion to MLA, two arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here