राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या महिला नेत्याची फेसबुकवर बदनामी, मनसेच्या १६ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
पुणे | Pune Crime: सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. यामध्ये आणखी भर पडली आहे. आता पुण्यातून आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्याची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधामध्ये अपशब्द आणि बदनामी (Defamation) केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.
यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. पुण्यातील फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये १६ जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पुनम काशिनाथ गुंजाळ वय २७ यांनी ही तक्रार दाखल केली आहे. फेसबुकवर “१ करोड ताईवर नाराज” असणाऱ्याचा ग्रुपवर अश्लील भाषेत शिवीगाळ झाली होती. याविषयी सोशल मीडियावर महिला पदाधिकाऱ्यांची बदनामी केली जात आहे, अशी तक्रार देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर शिवीगाळ आणि अश्लील भाषेत वक्तव्य केली जात होती. यामुळे याप्रकरणी मनसेचे पदाधिकारी सागर गजानन पाटील, प्रसाद राणे, ध्रुवराज ढकेडकर, राजेश दांडनाईक, कुमार जाधव, सचिन कोमकर, सावळ्या कुंभार, निजामुद्दीन शेख, सुधीर लाड इतर ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिस अधिक तपास करीत आहे.
Web Title: Defamation of this woman leader of NCP on Facebook