अहमदनगर: पत्नीचे अश्लील व्हिडियो व्हॉट्सअॅपवर पाठवून बदनामी
Ahmednagar Crime: अश्लील व्हिडियो नातेवाइकांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपवर पाठवून बदनामी.
अहमदनगर: आपल्या पत्नीचे अश्लील व्हिडियो नातेवाइकांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपवर पाठवून बदनामी केल्याप्रकरणी पतीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 354 (अ), 500 सह आयटी अॅक्ट कलम 67 (ए) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुळच्या नाशिक जिल्ह्यातील फिर्यादी यांचा विवाह पारनेर तालुक्यातील एका गावातील तरुणासोबत झाला आहे. फिर्यादीचे पतीने 14 जुलै, 2022 रोजी सकाळी त्याच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅपवरून फिर्यादीचे मामा, मावस भाऊ व दाजी यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर फिर्यादीचे अश्लिल व्हिडीओ व इतर रेकॉर्ड केलेले व्हिडीओ पाठविले. यामुळे फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होऊन बदनामी झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सायबर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.
Web Title: Defamation by sending obscene videos of wife on WhatsApp