Home अहमदनगर अहिल्यानगर: भर पाडव्याच्या दिवशी आढळले मृत अर्भक

अहिल्यानगर: भर पाडव्याच्या दिवशी आढळले मृत अर्भक

Breaking News | Ahilyanagar: स्त्री जातीचे नवजात अर्भक बेशुद्धावस्थेत आढळून आल्याची घटना.

dead infant was found on the day of Bhar Padva

शिर्डी : एकीकडे दिपावली पाडव्याच्या निमित्ताने सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना शिर्डीलगतच्या सावळीविहीर खुर्द गावात शनिवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी स्त्री जातीचे नवजात अर्भक बेशुद्धावस्थेत आढळून आल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की पहाटे ४ वाजेच्या सुमारास कुत्रे मोठ्या प्रमाणावर भुकत असल्याने सावळीविहीर खुर्द येथील दिलीप शिवराम माळी यांनी घराबाहेर येऊन पाहिले. यावेळी त्यांना रस्त्यावर नुकतेच जन्मलेले त्री जातीचे नवजात अर्भक बेशुद्ध अवस्थेत पालथ्या स्थितीत रोडवर पडलेले आढळले

. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती सावळीविहीर खुर्द ग्रामपंचायतीचे सदस्य महेश जमधडे सावळीविहीर येथील घटना यांना दिली. त्यांनी ही माहिती शिर्डी पोलिसांना दिल्यानंतर तात्काळ शिडीं पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अर्भकाला शिर्डी येथील साईनाथ हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी दाखल केले. यावेळी ते खी जातीचे अर्भक उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अभर्कास अज्ञात इसमाने जन्मल्यानंतर त्याची ओळख पटू नये म्हणून लपवण्याचा प्रवन केला. माळी यांनी शिर्डी पोलिसात तक्रार दिल्याने शिर्डी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ९४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शिडर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुंभार करीत आहेत.

Web Title: dead infant was found on the day of Bhar Padva

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here