Home अहमदनगर अहमदनगर: मृतदेह सापडला, अपहरण करून शेतकऱ्याचा खून

अहमदनगर: मृतदेह सापडला, अपहरण करून शेतकऱ्याचा खून

Ahmednagar News:  जनावरांच्या गोठ्यात झोपण्यास गेलेल्या तरुणाचे अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार, मृतदेह आढळून आल्याने प्रकरण उघडकीस.

Dead body was found, the farmer was kidnapped and killed

अहमदनगर : जनावरांच्या गोठ्यात झोपण्यास गेलेल्या तरुणाचे अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इमामपूर ता. नगर येथील हनुमंत दामोदर आवारे (वय २७ वर्षे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपहरण करून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. १५) उघडकीस आली. याप्रकरणी चार जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

जमिनीच्या वादातून शेतकऱ्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी अपहरण केलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी एकूण चार जणांचा अटक केली असून, आणखी एका आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे.

बाळू छबू भगत (रा. शेंडी, ता. नगर), शुभम भाऊसाहेब आहेर (रा. वडगावगुप्ता, ता. नगर), कैलास पठारे व दीपक साळवे (पूर्ण नाव माहीत नाही) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत मयताचा भाऊ कृष्णा दामोदर आवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद झाली होती. पोलिस तपासात मयताचे अपहरण करून खून केल्याचे समोर आले. फिर्यादी यांचे व त्यांच्या शेजारी राहणारे महेश अशोक आवारे यांच्यात शेतजमिनीवरून गेल्या पाच वर्षांपासून वाद आहे. सोमवारी (दि. ११) दुपारी त्यांचे चुलते बापू गोविंद आवारे यांचे व महेश आवारे यांच्या पत्नीसोबत वाद झाले होते. त्यानंतर फिर्यादीचा भाऊ हनुमंत आवारे हे बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या जनावरांच्या गोठ्यात झोपण्यासाठी गेले होते. दुसन्या दिवशी गुरुवारी सकाळी फिर्यादी कृष्णा आवारे हे गोठ्यावर गेले. त्यावेळी त्यांना त्यांचा भाऊ हनुमंत तिथे दिसला नाही. त्यांनी भावाच्या फोनवर फोन लावला. तेव्हा त्याचा फोन बंद होता. त्यानंतर दुपारी फिर्यादीला त्यांचा मित्र महेश राधाकिसन आवारे याचा फोन आला. तो म्हणाला की, माझा मामा बाळू भगत व शुभम आहेर अशा दोघांनी तुझा भाऊ हनुमंत याला उचलून नेऊन मारहाण केली आहे. तेव्हा कृष्णा आवारे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अपहरणाचा गुन्हा नोंद झाला. सहायक पोलिस निरिक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने हनुमंत अवारे यांचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह शेंडी गावापासून काही अंतरावर असलेल्या एका शेतात आढळून आला.

तांत्रिक विश्लेषणात वरील आरोपींची नावे समोर आली. त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर वाढीव भादंवि कलम ३०२ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरिक्षक राजेंद्र सानप यांनी दिली.

Web Title: Dead body was found, the farmer was kidnapped and killed

(आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here