Home अहिल्यानगर अहमदनगर: तरुणाचा उड्डाण पुलाखाली आढळला मृतदेह; घातपाताचा संशय

अहमदनगर: तरुणाचा उड्डाण पुलाखाली आढळला मृतदेह; घातपाताचा संशय

Breaking News | Ahmednagar: ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह रात्रीच्या दरम्यान पिंप्री अवघड येथील उड्डाण पुलाखाली छिन्नविछिन्न असलेल्या अवस्थेत आढळून आला.

Dead Body of young man found under flyover Accident suspected

राहरी: राहुरी तालुक्यातील बारागांव नांदूर येथील ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह रविवार १७ मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान पिंप्री अवघड येथील उड्डाण पुलाखाली छिन्नविछिन्न असलेल्या अवस्थेत आढळून आला. नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने खळबळ उडाली.

या घटनेतील मयत प्रकाश उर्फ मल्हारी छबू पवार (वय ३५) रा. बारागाव नांदूर, या वाहनचालक असलेल्या तरुणाने काल सायंकाळी त्याच्या काही मित्रांबरोबर राहुरी येथे जेवण केले. नंतर तो तेथून निघून गेला. अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली. त्यानंतर रात्री दहा वाजे दरम्यान प्रकाश उर्फ मल्हारी पवार याचा मृतदेह राही तालुक्यातील पिंप्री अवघड येथील उड्डाण पुलाच्या खाली छिन्नविछिन्न असलेल्या अवस्थेत आढळून आला. काल दि. १८ मार्च २०२४ रोजी शवविच्छेदनाच्या ठिकाणी मयत प्रकाश उर्फ मल्हारी पवार याचे नातेवाईक व मित्र मंडळींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. याप्रसंगी नातेवाईकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्याने खळबळ उडाली होती. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, समाधान फडोळ, सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड, हवालदार अंकुश भोसले, भाऊसाहेब शिरसाट, प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, गोवर्धन कदम आदी पोलीस पथकाने शवविच्छेदन ठिकाणी धाव घेतली.

यावेळी पोलीस पथकाने चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे समजते. नातेवाईकांनी प्रकाश उर्फ मल्हारी पवार याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली. पोलीस प्रशासनाकडून त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

Web Title: Dead Body of young man found under flyover Accident suspected

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here