संगमनेर: बायपासवर आढळला विवाहितेचा मृतदेह
Breaking News | Sangamner: विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर.
संगमनेर : संगमनेर तालुक्यात विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. सदर महिला ही अंभोरे येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
तालुक्यातील अंभोरे येथील रहिवासी विवाहित महिलेचा मृतदेह शुक्रवारी (दि. १४) रात्री बाराच्या सुमारास संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कासारा दुमाला शिवारात नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर आढळून आला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रंजना भिकाजी खेमनर (वय ३५, रा. अंभोरे), असे मयत महिलेचे नाव आहे. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: dead body of the married woman was found on the bypass
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study