अहिल्यानगर: हॉटेल परिसरात युवतीचा मृतदेह
Breaking News | Ahilyanagar: महामार्गालगतच्या एका हॉटेल परिसरात युवतीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.
श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी शिवारात अहिल्यानगर-सोलापूर महामार्गालगतच्या एका हॉटेल परिसरात युवतीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे.
बनपिंपरी शिवारात सोलापूर महामार्गावर एका हॉटेलवर राजरोसपणे वेश्या व्यवसाय चालतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथे परप्रांतीय मुलींना आणले जाते. येथील एका हॉटेल परिसरात मागील सात ते आठ दिवसांपूर्वी एका युवतीचा मृतदेह अज्ञात व्यक्तीकडून पुरण्यात आला होता. पुरावा नष्ट करण्याचा हा प्रयत्न असावा, असा अंदाज आहे. मृतदेहाचा वास सुटल्याने स्थानिकांकडून अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाला माहिती देण्यात आली. त्या माहितीच्या आधारे कर्जत विभागाचे पोलिस अधिकारी, श्रीगोंदा पोलिस, अहिल्यानगर पोलिसांकडून मृतदेह उकरण्यात आला. त्याचा पंचनामा करून जागेवरच पोस्टमार्टेम करण्यात आले. या घटनेबाबत उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम चालू होते. या प्रकरणाचा तपास श्रीगोंदा पोलिस करत आहेत.
Breaking News: dead body of girl in hotel area