संगमनेर: विहिरीतील पाण्यात तरंगताना आढळून आला तरुणाचा मृतदेह
Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या आभाळवाडी येथील एका विहिरीतील पाण्यावर तरुणाचा मृतदेह (Dead body) तरंगताना आढळून आल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी २२ एप्रिल रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.
निलेश उर्फ पप्पू एकनाथ आभाळे वय २९ असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी आभाळवाडी येथील येडू आईची यात्रा होती. निलेश उर्फ पप्पू हा यात्रेसाठी गेला होता. रात्री बारा वाजले तरी तो घरी न आल्याने मित्राकडे गेला असावा असे त्याच्या घरच्यांना वाटले. शुक्रवारी तो घरी आलाच नाही. म्हणून घरच्यांनी शोध घेतला असता त्यांच्याच विहिरीतील पाण्यावर त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि संगमनेर येथे मृतदेह कुटीर रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख हे करीत आहे.
Web Title: Dead body of a young man was found floating in the water of a well