अकोले: प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी मुलीची वेगळीच शक्कल, बापाची आत्महत्या
Breaking News | Akole: मुलीच्या कृत्यामुळे बापाची आत्महत्या
अकोले: अकोले तालुक्यातील हिवरगाव आंबरे परिसरात एका अल्पवयीन मुलीने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढविली. तिला बिबट्याने पकडून नेले असे भासविण्यासाठी तिने स्वतः झोपलेल्या ठिकाणी कोंबडीचे रक्त सांडून रक्ताचा सडा केला.
शेजारी आई झोपली होती तिने उठून पाहिले असता पहिला संशय बिबट्यावर घेतला आणि एकच आरडाओरड केली. त्यानंतर सकाळीच गावकरी, नातेवाईक यांनी रान पिजून काढले, पोलीस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील सर्वत्र शोधमोहीम राबविली. मात्र मुलीचा शोध लागला नाही. दरम्यान घटनास्थळी सापडलेले हे रक्त ना बिबट्याचे होते ना माणसाचे. लॅबमध्ये त्याची चाचणी करण्यात आली असता हे रक्त कोंबडीचे निघाले. रक्त कोंबडीचे तर मग मुलगी गेली कोठे? असा प्रश्न सर्वांना पडला. सदर मुलगी नळवाडी येथील एका मुलासोबत पळून गेली अशी माहिती समोर आली. त्यामुळे सर्व गावासामोर बापाची बदनामी झाली. या बदनामीच्या पश्चातापाने मुलीच्या वडिलांनी झाडावर चढून गळफास लावून खाली उडी मारली. त्याला काही व्यक्तींनी खालुन पकडले होते. मात्र, तडफडत त्या बापाने आपला जीव सोडला. या घटनेने खळबळ उडाली असून संबंधीत मुला- मुलीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे.
Web Title: Daughter’s look different, father’s suicide to run away with lover
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study