Home क्राईम पोटच्या मुलीला ढकलले चक्क देह व्यापारात- Crime News

पोटच्या मुलीला ढकलले चक्क देह व्यापारात- Crime News

Crime news:  बारावीतील पोटच्या मुलीला आई-वडिलांनीच पैशासाठी देह व्यापारात.

daughter was pushed into the prostitution trade

साकोली | भंडारा : बारावीतील पोटच्या मुलीला आई-वडिलांनीच पैशासाठी देह व्यापारात ढकलले, हा प्रकार साकोली तालुक्यात घडला. पीडितेच्या काकूने तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आई-वडिलांसह ६ आरोपींना अटक केली. एक फरार आहे.

पीडित मुलगी साकोलीत काकाकडे राहून शिक्षण घेत होती. कालांतराने वडिलांनी तिला गावाला नेले. काकाने १४ डिसेंबरला फोन करून तिच्या प्रकृतीची चौकशी केली असता हा प्रकार मुलीने सांगितला.

मुलुंडमधून दोन बहिणींची सुटका  पैशाचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन वेश्याव्यवसायात बहिणींना ढकलल्याचा प्रकार मुलुंडमध्ये समोर आला. पोलिसांनी दलाल श्वेता गोवळकर (३४) हिला अटक केली आहे.


लग्नास नकार दिल्याने युवतीची आत्महत्या

नंदुरबार : प्रेमसंबंध ठेवत ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने नैराश्येत गेलेल्या २१ वर्षीय युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना चौकी, ता. नवापूर येथे घडली. याप्रकरणी २१ डिसेंबरला नवापूर पोलिसांत युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस सूत्रांनुसार, मोरथुवा (ता. नवापूर) येथील युवतीचे एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. त्याने लग्नास नकार देत ‘तुला काय करायचे ते कर’, असे सांगून प्रेमसंबंध तोडले, यामुळे युवतीने घराशेजारील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.


उभ्या ट्रॉलीस धडकली कार; तीन शिक्षकांसह चालक ठार

औसा | लातूर : औसा- सोलापूर महामार्गावरील औशानजीकच्या उड्डाणपुलाजवळ गुरुवारी मध्यरात्री भरधाव कारने उसाच्या रिकाम्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. या अपघातात कारचालकासह तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचे इंजिन ४० फूट लांब जाऊन पडले होते. अपघातस्थळी मयतांच्या शरीराचे अवयव विखुरले होते. संजय बाबूराव रणदिवे (वय ४१, रा. विळेगाव, ता. देवणी), जयप्रकाश मोतीराम बिराजदार (४५ रा. खरोसा, ता. औसा), महेबूब मुन्वरखान पठाण (४५ रा. किल्लारी, ता. औसा), कारचालक राजेसाब नन्हू बागवान (३४ रा. किल्लारी, ता. औसा) अशी मयतांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, खरोसा येथील जि. प. केंद्रीय शाळेचे शिक्षक कारने शिवलीकडे जेवणासाठी गेले होते. परतताना हा अपघात झाला.

अपघाताच्या माहितीनंतर पोलिस आणि टोलनाक्यावरील कर्मचारी मदतीला धावले, मृतदेह छिन्नविच्छिन्न झाल्याने ओळख पटविण्यास अडचण येत होती. थंडी, अंधारामुळे मृतदेह बाहेर काढण्यास तीन तास लागले.

Web Title: daughter was pushed into the prostitution trade

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here