प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदीला अटक, दोन वर्षाची शिक्षा, काय आहे प्रकरण
Daler Mehandi Arrested: दलेर मेहंदी यांना मानव तस्करी प्रकरणात दोन वर्षाचा तुरुंगवास शिक्षा सुनावली आहे. १५ वर्षापूर्वीचे प्रकरण निकाली.
चंडीगड: मानव तस्करी प्रकरणात दलेर मेहंदी याला अटक करण्यात आली आहे. पंजाबच्या पतियाळा कोर्टाने मानव तस्करी प्रकरणात दोषी ठरवून त्याला दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्याच्याविरोधात १५ वर्षापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. १५ वर्षानंतर हा निकाल दिला आहे.
कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दलेर मेहंदीला ताब्यात घेतले आहे. २००३ मध्ये बल बेडा गावचा रहिवासी बक्शीश सिंगच्या तक्रारीवरून दलेर मेहंदी, त्याचा भाऊ शमशेर मेहंदी ध्यान सिंग आणि बुलबुल मेहता यांच्याविरोधात परदेशात पाठवण्याच्या नावाखाली फसवणूक करून २० लाख रुपये घेतल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती/
प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी याला मानव तस्करी प्रकरणात दोन वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पंजाबच्या पतियाळा कोर्टानं हा निर्णय दिला. १५ वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आहे. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्टानं दलेरला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर काही वेळातच त्याला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. २००३ मधील हे मानवी तस्करी म्हणजेच कबुतरबाजीचं प्रकरण आहे. या प्रकरणी १५ वर्षांनंतर कोर्टानं हा निकाल दिला.कोर्टाच्या निकालानंतर, दलेर मेहंदीला पतियाळाच्या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.
Web Title: Daler Mehandi Arrested