श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक यांचे चिरंजीवाची स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या
श्रीगोंदा: शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास दौंड येथील राहत्या घरात श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक लक्ष्मणराव नलगे या पुत्र दादासाहेब नलगे यांनी रिव्हालव्हर मधून स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली.
आत,आत्महत्या मागील नेमके कारण मात्र समजू शकले नाही. नलगे कुटुंब व्यावसायाच्या निमित्ताने दौंड येथे राहत होते. दादादासाहेब हे दौंड येथील व्यावसाय पाहत होते. त्यांच्याकडे परवानाधारक रिव्हालव्हर होता. दादासाहेब मागील एक महिन्यापासून आजारी असल्याचे समजते. या आजारपणाच्या नैराश्यातून किंवा इतर कारणामुळे आत्महत्या केली असावी हे पुढील पोलीस तपासात उघडकीस येईल.
त्यांनी नुकताच काही दिवसांपूर्वी आपला वाढदिवस साजरा करत सोशियल मेडीयावर फोटो टाकले होते. त्यानंतर ही घटना घडली. त्यांचा मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयात शवविचेदन करण्यासाठी नेण्यात आला होता. वैद्यकीय अहवाल हाती आल्यानंतर आत्महत्यचे गूड समोर येणार आहे.
Web Title: Dadasaheb Nalage Suicide