अहमदनगर: कंटेनरच्या धडकेत सायकलस्वार जागीच ठार
अहमदनगर | Ahmednagar| Rahuri: राहुरी फॅक्टरी येथे नगर मनमाड मार्गावर श्रीरामपूर नाका परिसरात रस्ता ओलांडत असताना कंटेनरने धडक दिल्याने सायकलस्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात (Accident) शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला.
सायकलस्वार राम वाघ(रा.प्रसादनगर, वय-४५) असे या अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे, कंटेनर(क्रमांक एच.आर 55 -ए-जी 5288) याने धडक दिल्याने सायकलस्वार जागीच मृत्यू झाला आहे.
या अपघातावेळी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पगारे, आदिनाथ कराळे व परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली. फॅक्टरी येथील नाक्यावर वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात असतात. या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Web Title: cyclist was killed on the spot in the collision of the container Accident