अहमदनगर: मिरचीच्या शेतात गांजाची लागवड, पोलिसांचा छापा सव्वा ४ लाखांचा गांजा जप्त
Ahmednagar News: मिरचीच्या शेतात गांजाची लागवड, पोलिसांचा छापा (raid), ४ लाख २९ हजार ८२० रुपये किमतीचा २१ किलो वजनाचा हिरवा गांजा जप्त
कर्जत: कर्जत पोलिसांनी अळसुंदे परिसरात गांजाची शेती करणाऱ्यावर छापा टाकून मोठी कारवाई केल्याची घटना समोर आली आहे. या कारवाईत सव्वाचार लाख रुपयांचा गांजा जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत अळसुंदे ते कोर्टी रस्त्याच्या बाजुस एकाने त्याच्या शेतात गांजा पिकाची लागवड केली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून गांजा जप्त केला. या कारवाईमध्ये ४ लाख २९ हजार ८२० रुपये किमतीचा सुमारे २१ किलो वजनाचा ओलसर झाडे हिरव्या रंगाचा गांजा जप्त केला.
बाळू मारुती गार्डी (वय ४५ वर्षे, रा. अळसुंदे, ता. कर्जत) याने त्याच्या गट नंबर ३३० मधील शेतात मिरचीच्या पिकात गांजाची झाडे लावल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून कर्जत पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनशाम बळप, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बोऱ्हाडे, मंगेश नागरगोजे व पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
Web Title: Cultivation of ganja in chili field, police raid, seizure of ganja
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App