Home अकोले अकोले:  बेपत्ता तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

अकोले:  बेपत्ता तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Akole News:  दोन दिवसांपासुन बेपत्ता असलल्या मयूर पवार या २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह (Dead body) लेंडी ओढ्यालगत असलेल्या शेटे यांच्या १०० फुट खोल विहिरीत आढळून आल्याने खळबळ.

The dead body of the missing youth was finally found

अकोले: शहरातील शाहूनगर येथील दोन दिवसांपासुन बेपत्ता असलल्या मयूर पवार या २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह लेंडी ओढ्यालगत असलेल्या शेटे यांच्या १०० फुट खोल विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या मयूरने का केली, याबाबत नेमके कारण अद्याप उघड झालेले नाही.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शाहूनगर येथील गरीब कष्टकरी कुटुंबातील सुशिक्षित हुशार मुलगा असलेला मयूर अण्णासाहेब पवार हा शिक्षण घेऊन त्याने राज्य राखीव दलाची परीक्षा देवून त्याचे त्यात निवड झाली होती. १५ तारखेला हजर होणार असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. हा मुलगा ७ सप्टेंबर रोजी मित्राचा मोबाईल दुरुस्त करुन येतो म्हणून घरातून गेला. तसा परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयाने शोध घेवून रात्री अकोले पोलिसांत मिसिंग दाखल केले होते. त्यानंतर पोलिसांसह नातेवाईकांनी दोन दिवस शोध घेत होते. दोन दिवसांनंतर रविवारी (दि. १०) दुपारी पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरुन माहितीवरुन भिंगारे गोडावूनच्या पाठीमागील परिसरातुन जाणाऱ्या लेंडी ओढ्याजवळ शोध घेतला असता लेंडी ओढ्याजवळ शेटे यांच्या शेतातील विहिरीत मयूरचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

त्यानंतर अकोले पोलिस स्टेशनचे कर्मचारी आहेर व सहकाऱ्यांनी स्थानिक तरूणांच्या मदतीने विहिरीत बाज सोडून त्याद्वारे मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत रात्री उशिरा अकोले पोलिसांत मयूर अण्णासाहेब पवार याच्या आत्महत्येची नोंद करण्याचे काम सुरू होते. मयूरने त्याची राज्य राखीव दलाचे भरतीत फसवणूक झाल्याने ही आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

Web Title: The dead body of the missing youth was finally found

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here