अहमदनगर: क्रूझर दुचाकीचा अपघात; एक ठार
Ahmednagar Accident: गुहा शिवारात साई भक्तांचे वाहन व दुचाकीचा अपघात, अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार, ८ ते १० साईभक्त गंभीर जखमी.
राहुरी | Rahuri: नगर-मनमाड मार्गावर गुहा शिवारात साई भक्तांचे वाहन व दुचाकीचा अपघात शनिवार, दि. ३१ दुपारी घडला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. क्रूझर वाहनातील ८ ते १० साईभक्त गंभीर जखमी झाले.
शिर्डी येथून दिल्ली येथील भाविकांची क्रूझर शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी जात असताना गुहा येथे क्रूझर व दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात वैजापूर तालुक्यातील ढोकनांदूर येथील विवाहित तरुण सुभाष कचरू गाढे यांचा जागीच मृत्यू झाला. मयत गाढे हे नगर येथे नोकरी करत होते. ते नगरवरून राहता येथे कार्यक्रमासाठी जात एका असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान, या अपघातात क्रूझर गाडीने ४ ते ५ वेळा पलटी मारल्याने यातील दिल्लीतील ८ ते १० साईभक्त गंभीर जखमी झाले असून त्यांना देवळाली प्रवरा येथील रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने उपचारार्थ दाखल करण्यात आले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Web Title: Cruiser bike accident kill one
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App