Crime: संगमनेर तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा
Sangamner Crime | संगमनेर: संगमनेर तालुक्यात घारगाव बस स्थानक परिसरात मटका जुगार सुरु असल्याची माहिती घारगाव पोलिसांना गुप्त खबरीद्वारे मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या पथकाने राजश्री लॉटरीच्या पाठीमागे शेडनेटमधील छतामध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
यावेळी नजाकतआली समशेरअली सय्यद वय ४० रा. जागीरदार वाडा सय्यदबाबा चौक संगमनेर हा लोकांकडून पैसे घेऊन मटका चालवीत असल्याचे समोर आले.
वाचा: Ahmednagar News
पोलिसांनी त्याच्याकडून ७६० रुपये रोख व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश तळपाडे यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राजू खेडकर करीत आहे.
Web Title: Crime Raid on gambling den in Sangamner taluka