Home अहिल्यानगर Crime News: दोन मुले असलेल्या तरुणाने अविवाहित तरुणीला पळविले

Crime News: दोन मुले असलेल्या तरुणाने अविवाहित तरुणीला पळविले

Crime News young man with two children kidnapped an unmarried young woman

राहुरी | Crime News: विवाहित तरुणाने तसेच दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय अविवाहित तरुणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. १९ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली असून आरोपी अन्सार अमीन पठाण याच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

राहुरी तालुक्यातील  शिंगणापूर रोडकडील एका गावातील एक 21 वर्षीय अविवाहित तरूणीस आपल्या कुटुंबासह राहत आहे. तिच्या घराशेजारीच आरोपी अन्सार आमीन पठाण हा 26 वर्षीय तरूण त्याची पत्नी व दोन मुलांसह राहतो. आरोपी अन्सार पठाण व ती तरूणी एकमेकांसोबत बोलत असे. काही दिवसांपूर्वी तरूणीच्या वडिलांनी दोघांना बोलण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी रात्री ९  वाजे दरम्यान ती तरूणी व तिच्या कुटुंबातील इतर सदस्य नेहमीप्रमाणे जेवणकेल्यानंतर झोपी गेले.

तरूणीच्या आईला पहाटेच्या वेळी जाग आली. त्यावेळी तेव्हा ती तरूणी घरातून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. तरूणीच्या वडिलांनी शेजारी राहणारा अन्सार आमीन पठाण याच्या घरी जाऊन तपास केला असता  अन्सारच्या पत्नीने अन्सार रात्रीपासून घरी आला नसल्याचे सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अपडेट बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा आमचा अॅप: संगमनेर अकोले न्यूज 

यावेळी तरूणीच्या वडिलांना संशय आल्याने  आरोपी अन्सार पठाण याने त्यांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी अन्सार आमीन पठाण याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास  पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव हे करीत आहेत.

Web Title: Crime News young man with two children kidnapped an unmarried young woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here