Crime News: दोघांनी तरुणास मारहाण करीत लुटले
अहमदनगर |Crime News| Ahmednagar: दोन जणांनी एका तरुणाला शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील २ हजार रुपये व आधार कार्ड बळजबरीने काढून घेतल्याची घटना नालेगावच्या दातरंगे मळ्यात मंगळवारी रात्री सात वाजता घडली. युवक सौरभ रवींद्र शिरसाठ (वय 18 रा. दातरंगे मळा, नालेगाव) या तरुणास मारहाण झालेली असून त्याने येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिंग्या ऊर्फ गणेश पोटे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व त्याचा मित्र यांच्याविरूद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. सौरभ शिरसाठ मंगळवारी रात्री सात वाजता किराणा दुकानात सामान खरेदीसाठी जात असताना दातरंगे मळ्यातील चर्च जवळ त्याला टिंग्या व त्याच्या मित्राने अडविले. त्याला शिवीगाळ व दगडाने मारहाण करून जखमी केले. खिशातील दोन हजार रुपये व आधारकार्ड बळजबरीने काढून घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान बुधवारी सकाळी तोफखाना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहेत.
Web Title: Crime News two beat the young man and robbed