संगमनेरात तीन जणांना अटक तर ३४ जणांवर गुन्हा
संगमनेर: एका धर्माच्या महापुरुषाबद्दल अक्षेपार्हे मजकूर समाजमाध्यामात व्हायरल केल्याने जिल्ह्यातील ३ जणांना संगमनेर शहर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या पोस्टला लाईक करत समर्थन केल्याबद्धल ३४ जणांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेतील इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
अमित भोंडवे रा. सोनई, ऋषिकेश ठाकरे रा. मालेगाव हवेली संगमनेर, शुभम राजहंस रा. नगर अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
गुन्हेगार स्थानिक नसल्याने शहरात सामाजिक सलोखा कायम रहावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेचा शहरातील सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी निषेध नोंदविला आहे. या घटनेने शुक्रवारपासून शहरात तणाव निर्माण झाला होता. शहरातील समाजातील प्रमुख व्यक्तीची पोलिसांनी भेट घेऊन शहर पोलीस ठाण्यात बैठक घेतली. पोलीस अधिकारी यांनी शहरातील सामाजिक संघटना व राजकीय पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संपर्क करून शहर पोलीस ठाण्यात चर्चा घडवून आणली.
Web Title: Crime News Three arrested and 34 charged in Sangamner