लाईट मीटर काढण्याच्या वादातून तरुणास लाथा बूक्क्यांनी व दगडाने मारहाण
राहुरी | Crime News | Rahuri: लाईट मिटर काढण्याच्या वादातून एका तरुणास लाथा बूक्क्यांनी व दगडाने मारहाण केल्याची तसेच मोटारसायकलची तोडफोड केल्याची घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील हॉटेल मानसी येथे घडली आहे. याबाबत 30 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप रायभान चव्हाण( वय २८ वर्षे ,राहणार देवळाली प्रवरा तालूका राहुरी ) या तरूणाने राहुरी पोलिसात सकाळी दहा वाजता देवळाली प्रवरा परिसरातील हॉटेल मानसी येथे संदिप चव्हाण व त्याचा एक मित्र दोघेजण जेवण करीत होते.
तेव्हा आरोपी तेजस कैलास पडाळे राहणार देवळाली प्रवरा ता. राहुरी. हा तेथे आला. तेव्हा तो संदीप चव्हाण याला म्हणाला की, तु माझे दुकानाचे लाईट मीटर का काढले असे म्हणाले असता संदीप चव्हाण त्याला म्हणाला की, मी तुमच्या दुकानाचे मीटर काढले नाही. असे म्हणाल्याचा तेजस पडाळे यास राग आल्याने त्याने संदीप चव्हाण यास उचलुन खाली पाडले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याच्या कानाजवळ काचेची बाटली मारुन दुखापत केली. तसेच त्याचा मिञ सचिन शिवाजी होले हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही लाथा बुक्कानी मारहाण, शिवीगाळ केली आणि संदीप चव्हाण याची मोटार सायकलवर दगड टाकुन मोडतोड केली. नंतर जीवे मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी संदीप रायभान चव्हाण याच्या फिर्यादीवरून आरोपी तेजस कैलास पडाळे याच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक जानकीराम खेमनर हे करीत आहेत.
Web Title: Crime News Rahuriyouth was kicked, punched and stoned