Crime News: अल्पवयीन मुलीचा विनयभंग
कोल्हार | crime News: नात्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. मुलीस हातवारे करत अश्लील भाषेत बोलून हातवारे करत विनयभंग केल्याचा प्रकार केल्याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात कोल्हार बुद्रुक येथील बाळासाहेब यशवंत लोखंडे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात असून. आरोपीस मंगळवारी रात्री अटक करण्यात आली आहे.
याबाबत अल्पवयीन मुलीने फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, बाळासाहेब यशवंत लोखंडे याने दि. १४ सप्टेंबर आणि १९ सप्टेंबर २०२१ रोजी सदर मुलीकडे पाहून अश्लिल हातवारे करीत वाईट नजरेतून व अश्लिल भाषेत बोलून शिवीगाळ करीत तिचा विनयभंग केला.
याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३७५ भारतीय दंड विधान कलम ३५४ (अ), बाललैंगिक अधिनियम २०२१ चे कलम १२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे हे करीत आहेत.
Web Title: Crime news Kolhar Molestation of a minor girl