महिलेसोबत एकत्र फोटो दाखवून ब्लॅकमेल केल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
शेवगाव | Crime News: तालुक्यातील देवागावच्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने त्याच्या मुलाच्या फिर्यादीवरून तिघांवर शेवगाव पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत शेतकऱ्याच्या नातेवाईक यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्याने पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी पहाटे संभाजी साहेबराव खरड वय ५५ रा. देवटाकळी या शेतकऱ्याने राहत्या घरासमोरील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
मायात शेतकऱ्याचा मुलगा महेश संभाजी खरड यांनी फिर्याद घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी भाऊराव पोपट वाघमारे, शरद अण्णा वाघमारे व कैलास रतन वाघमारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील तीन जणांनी तीन महिन्यापासून एका महिलेशी संभाजी खरड यांचा एकत्र फोटो दाखवून त्यांचे अनैतिक संबध आहेत. असे सांगून वारंवार ब्लॅकमेल करत होते. त्यांच्याकडे पैशाची मागणी करीत होते. त्यावेळी त्यांनी चार लाख रुपये तिघांना दिले होते. काही दिवसांपूर्वी ८ लाख रुपयांची मागणी केली होती. ग्रामपंचायत कार्यालयासमोर मधुकर वाघमारे यांनी संभाजी यांना गजाने मारहाण केली होती. संभाजी यांचे उजव्या हाताचे हाड मोडले होते. वरील तिघेच आत्महत्या करण्यास कारणीभूत असल्याचे महेश खरड यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.
Web Title: Crime News Farmer commits suicide by blackmailing a woman