मनपा मुख्य लेखाधिकार्याला अटक, मनपा वर्तुळात खळबळ
अहमदनगर |Crime News: महापालिका वर्तुळात खळबळजनक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी 20 हजारांच्या लाचेची (Bribe) मागणी करून स्वीकारण्याची संमती दर्शविल्याने येथील महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी प्रवीण गोपाळराव मानकर (वय 52 रा. दिल्ली गेट) याच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करत मानकर याला अटक केली आहे.
तक्रारदार व त्यांचे मावसभाऊ यांनी ठेकेदार म्हणून महानगरपालिकेच्या केलेल्या कामाची बिले मंजूर करून तक्रारदार यांना चेक अदा केलेच्या मोबदल्यात मानकर याने तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रूपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे 7 ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून त्याच दिवशी केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये मानकर याने तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रूपयांची मागणी करून 15 हजार रूपये स्विकारण्याची तयारी दर्शविल्याने बुधवारी लाचलुचपत विभागाने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Crime News Corporation Chief Accounts Officer arrested