Home अहमदनगर राहुरी तालुक्यातून आणखी एका मुलीचे अपहरण, गुन्हा दाखल

राहुरी तालुक्यातून आणखी एका मुलीचे अपहरण, गुन्हा दाखल

Crime News Another girl abducted from Rahuri taluka

राहुरी | Crime News: राहुरी तालुक्यातील एका गावातून दि. 1 डिसेंबर रोजी आई-वडिलांच्या कायदेशीर रखवालीतून त्यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला  पळवून नेल्याची घटना घडली आहे. या अल्पवयीन मुलीला अक्षय पवार या तरूणाने पळवून नेल्याचा संशय तिच्या आई-वडिलांनी व्यक्त केला आहे.

तालुक्यातील एका गावात मुलीचे वडील आपल्या कुटुंबासह राहतात. ते मोल मजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि. 1 डिसेंबर रोजी रात्री नेहमी प्रमाणेच कुटुंबातील लोकं जेवण करुन झोपी गेले. 2 डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजे दरम्यान त्या मुलीचे वडील झोपेतून उठले. त्यावेळी त्यांची 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात दिसली नाही. तेव्हा घरातील लोकांनी आजूबाजूला व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. याप्रकरणी त्या मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय पवार याच्या विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

गेल्या महिनाभरापासून  अपहरणाची पाचवी  घटना असून यापूर्वीच्या अपहरणाच्या घटनेचा तपास लावण्यात राहुरी पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Crime News Another girl abducted from Rahuri taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here