Crime News: घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेचा विनयभंग
राहुरी | Crime News: राहुरी तालुक्यातील पिंपरी वळण येथे घरासमोर उभ्या असलेल्या ४० वर्षीय महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना घडली आहे. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी इब्राहिम शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, २७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ४० वर्षीय महिला तिच्या घरासमोर उभी होती. त्यावेळी आरोपी इब्राहीम शेख रा. पिंपरी वळण त. राहुरी हा तेथे आला आणि त्याने सदर महिलेला पाठीमागून कवळी मारून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. सदर महिलेने तिच्या नातेवाईकांसह राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Crime news 40 years old woman Rape