संगमनेर: बांधावरुन वाद पती-पत्नीला जबर मारहाण
Breaking News | Sangamner Crime: शेतजमिनीच्या बांधावरुन शेतकरी पती-पत्नीस बेदम मारहाण केल्याची घटना. चौघांवर संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल.
संगमनेर:तालुक्यातील खांडगाव येथे शेतजमिनीच्या बांधावरुन शेतकरी पती-पत्नीस बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
खांडगाव शिवारात सुमन नारायण गुंजाळ यांची आणि दीर गणपत सीताराम गुंजाळ यांची शेजारी शेजारी शेतजमीन आहे. गणपत गुंजाळ हे नेहमीच बांध कोरण्यावरुन वाद घालत असतात. मात्र, सुमन गुंजाळ व पती नारायण गुंजाळ हे वयोवृद्ध असल्याने त्याकडे दुर्लक्ष करतात. दरम्यान, ३ फेब्रुवारीला पुतण्या विक्रम गणपत गुंजाळ हा सुमन गुंजाळ यांच्या शेताच्या बांधालगत टिकावाने खोदत असल्याने त्यास त्यांचे पती नारायण गुंजाळ यांनी विचारणा केली असता त्याचा राग आल्याने खोऱ्याच्या दांड्याने मारहाण केली. तसेच हा वाद सोडवण्यास सुमन गुंजाळ या गेल्या असता त्यांनाही विक्रमने ढकलून दिले तर सागर गणपत गुंजाळ याने मारहाण केली. त्याचवेळी जाव सुनीता गणपत गुंजाळ व दीर गणपत सीताराम गुंजाळ तेथे आले आणि त्यांनीही शिवीगाळ करुन नारायण गुंजाळ यांना मारहाण केली. जर पुन्हा जमिनीचे नाव काढले तर तुझे व तुझ्या नवऱ्याचे हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली.
याप्रकरणी सुमन गुंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी वरील चौघांविरुद्ध गुरनं. ८८/२०२४ भादंवि कलम ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.
Web Title: Crime Husband and wife were severely beaten after a dispute over the dam
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study