खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नगरमध्ये गुन्हा दाखल
Breaking News | Ahmednagar: पंतप्रधानांचा एकेरी भाषेत उल्लेख करून प्रक्षोभक भाषण.
अहमदनगर: शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नगर येथे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार अतुल काजळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ८ मे रोजी ही घटना घडली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात झाला म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे. ती जी माती आहे ती
औरंगाजेबाची माती आहे, असे बोलून देशाच्या पंतप्रधानांचा एकेरी भाषेत उल्लेख करून प्रक्षोभक भाषण केले. पंतप्रधान यांना धमकी दिली. तसेच दोन धर्मामध्ये द्वेषाची व वैरत्वाची भावना निर्माण करण्याचा भाषणादरम्यान प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी खासदार राऊत यांच्या विरोधात भादंवि कलम १७१ (क), ५०६ व लोकप्रतिनिधी अधिनियम कायदा कलम १२३ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Crime has been registered in the city against MP Sanjay Raut
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study