संगमनेर: तीन खासगी सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल
Breaking News | Sangamner Crime: खासगी सावकारीच्या प्रकरणात अखेर काल शुक्रवारी तीन सावकाराविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
संगमनेर : गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या तालुक्यातील साकूर येथील खासगी सावकारीच्या प्रकरणात अखेर काल शुक्रवारी तीन सावकाराविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर तालुक्यात बेकादेशीरपणे खासगी सावकारकी करण्याचे प्रमाण वाढले आहे. खासगी सावकारांकडून नागरिकांची मोठी आर्थिक पिळवणूक केली जात आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर येथे खाजगी सावकारकीचा व्यवसाय जोरात सुरू आहे.
साकुर येथील सचिन बन्सी डोंगरे, बन्सी पंढरीनाथ डोंगरे, राहुल किसन डोंगरे हे खाजगी सावकारीचा व्यवसाय करतात. साकुर येथील विलास दौलत वाकचौरे यांनी त्यांच्याकडून व्याजाने १० लाख रुपयांची रक्कम घेतली होती. त्यांनी व्याजापोटी रक्कम देऊनही त्यांच्याकडे तगादा करण्यात आला. याबाबत साकुर येथील विलास वाकचौरे यांनी दि. २८ जानेवारी २०२४ रोजी उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात सचिन चन्सी डोगरे, बन्सी पंढरीनाथ डोंगरे व राहुल क्सिन डोंगरे (सर्व रा. साकुर, ता. संगमनेर) यांच्या विरुद्ध बेकायदेशीर सावकारी बाबतचा तक्रार अर्ज दिला होता. दिनांक ६ फेब्रुवारी रोजी शपथपत्र करुन दिले. त्यासोबत कागदपत्रे सादर केली होती. उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने सावकाराच्या घरी छापा टाकून पंचनामा केला होता. सहकार खात्याच्या पथकाने संपूर्ण चौकशी करून माहिती घेतली. त्यांनी खासगी सावकारांचे सर्व कागदपत्र तपासले. यानंतर सहकार अधिकारी राजेंद्र वाकचौरे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सचिन डोंगरे, बन्सी डोंगरे व राहुल डोंगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Crime has been registered against three private lenders
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study