Home अहिल्यानगर फेसबुकवर महिलेचा अश्लील व्हिडियो बनवून अपलोड केल्याप्रकरणी गुन्हा

फेसबुकवर महिलेचा अश्लील व्हिडियो बनवून अपलोड केल्याप्रकरणी गुन्हा

Rahata News: व्हिडियो अपलोड करत महिलेच्या नंबरवर पाठवून बदनामी.

Crime for making and uploading an obscene video of a woman on Facebookराहता: महिलेने फेसबुकवर टाकलेल्या व्हिडियो मार्फिंग करून त्याठिकाणी अश्लील व्हिडियो अपलोड करत महिलेच्या नंबरवर पाठवून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राहता तालुक्यातील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात विनयभंगाच्या कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेचे फेसबुकवर पेज आहे. या पेजवर सदर महिलेने लाईव्ह व्हिडिओ अपलोड केले होते. एका अनोळखी व्यक्तीने त्या व्हिडिओमध्ये मार्फिंग करत अश्लिल व्हिडिओ अपलोड केला. फिर्यादी महिलेच्या फोटोखाली अश्लिल मजकूर लिहिला. त्याची व्हिडिओ क्लिप महिलेच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली. त्यामुळे महिलेला प्रचंड मानसिक त्रास झाला.

या महिलेने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यांनी पोलिसांत फिर्याद देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात येऊन याबाबतची फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी त्या मोबाईलधारकाविरूध्द विनयभंग आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crime for making and uploading an obscene video of a woman on Facebook

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here