संगमनेर: मुलीचा विवाह, घरीच प्रसूती, पोटात दुखायला लागल्याने धक्कादायक प्रकार उघडकीस
Sangamner Crime: संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात अल्पवयीन मुलीचा विवाह होऊन प्रसूती झाल्याची धक्कादायक प्रकार समोर.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात अल्पवयीन मुलीचा विवाह होऊन प्रसूती झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्यानंतर गर्भधारणा होऊन तिची घरीच प्रसूती झाली. त्यानंतर तिच्या पोटात दुखायला लागल्याने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर मुलगी अल्पवयीन असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाणवल्याने त्यांनी पोलिसांना कळविले. मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री झाल्याने या प्रकरणी गुरुवारी (दि.४) संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
१७ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तिचा नवरा, तिचे आई-वडील, सासू-सासरा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुलीचे माहेर आणि सासर हे दोन्हीही संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहे. २५ जानेवारी २०२२ ला अल्पवयीन मुलीचे लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांनी तिला गर्भधारणा झाली. त्यानंतर तिची घरीच प्रसूती झाली. मात्र, तिच्या पोटात दुखायला लागल्याने तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांना मुलगी अल्पवयीन असल्याचे जाणवल्याने त्यांनी याबाबत तालुका पोलिसांना कळविले. पोलिसांनी मुलीच्या जन्म दाखला आणि आधारकार्ड यावरील तारीख याची खात्री केली. त्यात ही मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री झाल्याने गुन्हा दाखल केला.
Web Title: Crime case of a minor girl getting married and giving birth
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App