संगमनेरात रावसाहेब खेवरे यांच्या पुतळा दहनप्रकरणी १६ जणांवर गुन्हा
Sangamner Crime: संगमनेर बसस्थानकाबाहेर शिवसैनिकांनी खेवरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन.
संगमनेर : जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या तालुक्यातून एकही पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य नाही. राहुरी आणि देवळाली प्रवरा नगर परिषदेमध्ये एकही नगरसेवक नाही. प्रत्येकवेळी शिवसेनेच्या उमेदवाराला पाडण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे रावसाहेब खेवरे हे विखेंचे हस्तक आहेत, अशी टीका शिवसैनिकांनी केली. तसेच संगमनेर बसस्थानकाबाहेर शिवसैनिकांनी खेवरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.
काही शिवसैनिकांनी आंदोलन करत शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बबन घोलप यांचाही निषेध केला. हे चुकीचे केले. या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही शिवसैनिकांनी ‘खेवरे हटाव शिवसेना बचाव’ची घोषणा दिली
चार दिवसांपूर्वी शिवसेनेची नवीन कार्यकरिणी जाहीर झाली होती. त्या कार्यकारिणीस स्थगिती देण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचा आम्ही निषेध करतो, असेही शिवसैनिक म्हणाले. आहे. खेवरे यांच्या मनासारखे झाले नसल्याने त्यांनी उत्तर नगर जिल्ह्यातील ज्या पदाधिकाऱ्यांना पदे मिळाली नाहीत, त्यांची माथी भडकविण्याचे काम केले. त्यांना आंदोलन करण्यास सांगितले.
त्यांना हटविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही शिवसैनिकांनी सांगितले.
खेवरे यांच्या पुतळा दहनप्रकरणी १६ जणांवर गुन्हा
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
त्रिलोक कन्हैयालाल (रा. संजय गांधीनगर, संगमनेर) यांच्या नेतृत्वाखाली अजीज याकूब मोमीन (रा. मोमीनपुरा, संगमनेर), गोविंद अलका नागरे (रा. नेहरू चौक, संगमनेर), राजू सीताराम सातपुते (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), सचिन पावलस साळवे (रा. मालदाड रोड, संगमनेर), अमोल डुकरे (रा. शनी मंदिराजवळ, रंगारगल्ली, संगमनेर), शोएब मुजिक शेख (रा. देवी गल्ली, संगमनेर), अक्षय बळीराम बिल्लाडे (रा. संगमनेर), विकास पांडुरंग डमाळे (रा. अकोले रोड, संगमनेर), अक्षय गाडे (रा. तेलीखुंट, संगमनेर), विजय भागवत (रा. इंदिरानगर, संगमनेर) वैभव अभंग (रा. इंदिरानगर, संगमनेर) व इतर ३ ते ४ अनोळखी इसम यांनी मतभेदांमुळे कोणतीही पूर्वकल्पना न देता जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे (नाना) यांचा फोटो असलेल्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले होते.
मी मातोश्रीचा एकनिष्ठ शिवसैनिक आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच मी हस्तक आहे. माझ्यावर जे आरोप करत आहेत, त्यांची मुळात लायकीच नाही. त्यांच्यात आणि माझ्यात जमीन-आसमानचे अंतर आहे. त्यामुळे मला काही फरक पडतो नसतो. मी निष्ठावंत आहे, माझ्यावर आरोप करणारे भलेभले आले आणि गेलेही. माझ्यावर आरोप करणायांना ज्यांनी बोलायला लावले, त्यांचा बोलवता धनीही त्यांनी अनेक वेळा शिवसेनेशी गद्दारी केली. मात्र, मी २७ वर्षे शिवसेनेचे एकनिष्ठ काम करतो. शिवसे शाखाप्रमुख, शहरप्रमुख, तालुकाप्रमुख आणि आज १३ वर्षे झाले. मी जिल्हाप्रमुख आहे.
– रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख शिवसेना. [उध्दव बाळासाहेब ठाकरे ]
Web Title: Crime against 16 persons in connection with burning effigy of Raosaheb Khevre
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App