संगमनेर: दुसरे लग्न केले म्हणून कोयत्याने वार, महिलेचा विनयभंग
Sangamner Crime: दुसरे लग्न केले म्हणून संतापलेल्या पहिल्या पत्नीसह माहेरकडील सहा- सात जणांनी एकास कोयत्यासह बांबूने जबर मारहाण करीत गंभीररित्या जखमी, घरातील महिलेस लज्जा उत्पन्न (Molested) होईल, असे वर्तन, सात जणांवर गुन्हा दाखल.
संगमनेर: पहिली पत्नी असताना दुसरे लग्न केले म्हणून संतापलेल्या पहिल्या पत्नीसह माहेरकडील सहा- सात जणांनी एकास कोयत्यासह बांबूने जबर मारहाण करीत गंभीररित्या जखमी केले. शांताराम साहेबराव देशमुख असे जखमी इसमाचे नाव आहे. दरम्यान, घरातील महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करीत दोघांनी तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील जाखुरी येथे घडली.
जाखुरी येथील शांताराम साहेबराव देशमुख याने पहिली पत्नी असताना दुसरे लग्न केले. पहिली पत्नी स्वाती देशमुखसह तिची आई चंद्रकला ज्ञानदेव जाधव, वडील ज्ञानदेव जाधव (तिघे रा. वंजारवाडी, मनमाड) यांच्यासह विनोद वाबळे (रा. शहाजापूर, कोपरगाव), सोन्या डोमसे (रा. मंगळूर, ता. चांदवड, जि. नाशिक), राधाकिसन जाधव (रा. धारणगाव खडक) व सोन्या ढोमसे याची आई (रा. मंगळूर) हे सर्व जन जाखुरी येथे शांताराम देशमुख यांच्या घरी आले. घरात महिला होती. शांताराम काही कामानिमित्ताने संगमनेरला गेला होता.
त्यांच्या घरी कामास असलेल्या महिलेशी विनोद वाबळे व सोन्या डामसे या दोघांनी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत तिचा विनयभंग केला. याच दरम्यान शांताराम संगमनेरवरून घरी आला. यावेळी पहिली पत्नी स्वाती, आई चंद्रकला, वडील ज्ञानदेव यांनी त्याला दारातच अडविले.
‘पहिली पत्नी असताना तू दुसरे लग्न का केले,’ असा जाब विचारीत राधाकिसन जाधव याने बांबूने शांतारामच्या उजव्या पोटरीवर जबर मारहाण केली. जानदेव जाधवने कोयत्याने उजव्या पंजावर जबर मारून जखमी केले. शांतारामला शिवीगाळ करून सर्वांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शांताराम देशमुख याने दिलेल्या फिर्यादीवरून 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पो. नि. देविदास ढुमणे व स. फौ. जे. ए. सय्यद करीत आहेत.
Web Title: Coyote stabs, molested woman for remarrying
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App