Home संगमनेर संगमनेरात कोव्हॅॅक्सिनचा पहिला डोस पूर्ण केलेले नागरिक दुसऱ्या डोस पासून वंचित प्रशासनाचे...

संगमनेरात कोव्हॅॅक्सिनचा पहिला डोस पूर्ण केलेले नागरिक दुसऱ्या डोस पासून वंचित प्रशासनाचे ढसाळ नियोजन

covaxin in Sangamner were deprived of the second dose

संगमनेर | प्रतिनिधी ज्ञानेश्वर गायकर पाटील : राज्यात लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी नागरिक स्वतःहून पुढे येत असून, मात्र प्रशासन व लोक प्रतिनिधी यांच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक नागरिक  कोव्हॅॅक्सिन च्या दुसऱ्या डोस ची मुदत संपली तरी दुसऱ्या डोस पासून वंचित असल्याचे एक विचित्र स्थिती समोर आले आहे. कोव्हिशिल्ड ची मात्रा  राज्यात बऱ्या पैकी उपलब्ध असून , कोव्हॅॅक्सिन मात्र पूर्णपणे टंचाई असल्याचे जाणवत आहे. कोव्हाक्सिन चा दुसरा डोस एक ते दीड महिन्याच्या आत घेणे बंधनकारक असताना दोन महिने उलटूनही कोव्हाक्सिन चा दुसरा डोस ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षे पुढील नागरिकांना संगमनेर तालुक्यात मिळत नसल्याने जनतेत चिंता वाढली आहे. खाजगी रुग्णालय मध्ये मिळणारी पेड सर्व्हिस लस ही बंद करण्यात आली असून, लसीकरण सध्या सरकारी रुग्णालयात होत असून,  पुरेसे मनुष्य बळ अभावी लसीकरण कसे पूर्ण होईल यात शंका आहे.

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे कोव्हॅॅक्सिन लस आरोग्य सेतू ॲप वर दिसते, मात्र सदर लस फक्त १८ ते ४५ वयोगटात असणाऱ्या  नागरिकांना प्रथम डोस म्हणून दिली जाते, वास्तविक ही लस प्रथम ज्या नागरिकांचा कोव्हाक्सिन चा पाहिला डोस पूर्ण झाला आहे, त्यांना प्राथमिकतेने देणे आवश्यक आहे,  मात्र तसे न करता केवळ सरकारी आकडेवारीच्या टार्गेट मध्ये  जनतेच्या जिवाशी प्रशासन खेळत आहे व सरकारी उद्दिष्ट पूर्ण करण्यास  स्वतःची पाठ थोपटून  घेत आहे. ढिसाळ कारभाराचा हा  निर्णय प्रशासन का  घेत आहे असा प्रश्न नागरिक विचारात आहे. कोव्हीशिल्ड लस ही कोव्हॅॅक्सिन पेक्षा जास्त प्रमाणात राज्यात उपलब्ध असताना १८ ते ४५ वयोगटातील पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना  कोव्हॅॅक्सिन पेक्षा कोवीशिल्ड उपलब्ध करून देऊन कोव्हाक्सिन ही लस विशेष बाब म्हणून  ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांना देणे आवश्यक आहे. जर लस निर्धारित वेळेत घेतली नाही तर तिसरी लाट अनेकांचे बळी घेऊ शकते , हा तज्ज्ञांनी व्यक्त केलेला अंदाज प्रशासनाच्या कानावर गेलाच नाही असे एकंदरीत चित्र आहे.

आमच्या प्रतिनिधीने घुलेवाडी येथे संपर्क साधला असता कोणी ही या बाबत भाष्य करण्यास तयार नाही. सध्या संगमनेर येथे घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय वगळता इतरत्र ही लस उपलब्ध नाही. या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक गरके मारत असून, चिठी लिहा, फोन येईल व दुसरा डोस मिळेल, हे मागील आठवड्या पासून साचेबंद उत्तर मिळत आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे यांनी या बाबीकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे असून, अनेकांनी मुख्यमंत्री, प्रधान मंत्री पोर्टलवर तक्रारी ही दाखल केल्या आहेत. ज्याचा वशिला त्याला लस  “कोविड योद्धा” म्हणून दिली जाते,  असे निदर्शनास आले आहे. याबाबत उचित पाऊले प्रशासन यांनी उचलली नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा ही नागरिकांनी दिला आहे.

Web Title: covaxin in Sangamner were deprived of the second dose

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here