अहमदनगर: भरधाव कारने बाईकवरील जोडप्याला हवेत उडवलं
Breaking News | Ahmednagar: अंगावर काटा आणणार अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला.
अहमदनगर : नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पाठीमागून येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले आहेत. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, नगर कल्याण महामार्गावर पिंपरी पेंढार येथे भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. पती पत्नी दुचाकीवरून जात होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीला उडवले. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरुन पती-पत्नी अक्षरशः हवेत उडाले होते. अंगावर काटा आणणार अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
या अपघातात दोघेही थोडक्यात बचावले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पती-पत्नीला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
Web Title: couple on a bike was thrown into the air by a speeding car
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study