Home अहिल्यानगर अहमदनगर: सहायक अभियंत्यास कर्मचाऱ्याकडून मारहाण

अहमदनगर: सहायक अभियंत्यास कर्मचाऱ्याकडून मारहाण

Breaking News | Ahmednagar: तु नेहमी कर्तव्यावर गैरहजर राहतो, आलास तर दारू पिऊन येतो, असे म्हणाल्याचा राग आल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्याने सहाय्यक अभियंता यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना.

Assistant Engineer assaulted by employee

अहमदनगर: तु नेहमी कर्तव्यावर गैरहजर राहतो, आलास तर दारू पिऊन येतो, असे म्हणाल्याचा राग आल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्याने सहाय्यक अभियंता यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना केडगाव शाखेत गुरूवारी (18 जुलै) सकाळी घडली.

दत्तात्रय देविदास दसपुते (वय 43 रा. साईनगर, लिंक रस्ता, केडगाव) असे मारहाण झालेल्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारा संशयित स्वप्नील चंद्रसेन गांगुर्डे (रा. शास्त्रीनगर, केडगाव) याच्याविरूध्द शासकीय कामात अडथळा, शिवीगाळ, मारहाण आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, सहाय्यक अभियंता दसपुते हे गुरूवारी सकाळी नऊच्या सुमारास महावितरणच्या केडगाव शाखेत होते. त्यावेळी गांगुर्डे तेथे आला व तो हजेरी रजिस्टरवर सही करत असताना दसपुते त्याला म्हणाले, ‘तु नेहमी कर्तव्यावर गैरहजर राहतो व कर्तव्यावर येताना दारू पिऊन येतो’ असे म्हणताच गांगुर्डे याला राग आला व त्याने दसपुते यांना शिवीगाळ करून मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली.

जातीयवादी संघटनेकडून गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दसपुते यांनी सदरचा प्रकार कोतवाली पोलिसांना सांगून रात्री उशिरा फिर्याद दिली. पोलिसांनी गांगुर्डे विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कपिले करत आहेत.

Web Title: Assistant Engineer assaulted by employee

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here