Home अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदारासह कुटुंबातील चार जणांना करोनाची लागण

जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदारासह कुटुंबातील चार जणांना करोनाची लागण

Coronavirus Shiv Sena MLA, contracted corona infected

Coronavirus/अहमदनगर: जिल्ह्यातील एका शिवसेनेचे माजी आमदार यांना करोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील चार जणांना करोनाची लागण झाली आहे. शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत.

नगर शहर गेल्या काही दिवसांपासून करोनाचा शिरकाव वाढला आहे. शहराच्या मध्य भागातही करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. याच भागातील शिवसेना नेते माजी आमदार अनिल राठोड यांचे संपर्क कार्यालय आहे.

रविवारी अचानक त्यांना लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी आपले स्त्राव करोना तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने सोमवारी त्यांची पत्नी, मुलगा व सून या चार जणांचे अहवाल काल रात्री पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. या चारही जणांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.    

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Shiv Sena MLA, contracted corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here