संगमनेर तालुक्यात रविवारी ११ नवे करोनाबाधित, दोन मृत्यू
Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज सकाळी एक पॉझिटिव्ह अहवालानंतर सायंकाळी दहा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यात करोनाबाधितांची संख्या ३५९ वर पोहोचली आहे.
आज रविवारी सकाळी कुरण येथील १६ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात संगमनेर शहरातील मालदाड रोड येथे २० वर्षीय तरुण व ४३ वर्षीय पुरुष, पार्श्वनाथ गल्ली येथील ५५ वर्षीय पुरुष, ऑरेंज कॉर्नर येथे ६० वर्षीय महिला, ३७ वर्षीय पुरुष, नाईकवाडापुरा येथे ४७ वर्षीय महिला, बाजारपेठ येथे ६५ वर्षीय पुरुष तर राजापूर गावात ६५ वर्षीय पुरुष व ४४ वर्षीय महिला , कसारा दुमाला येथील ८७ वर्षीय पुरुष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आज तालुक्यात आठ करोनाबाधित आढळून आले आहेत.
संगमनेर तालुक्यातील कसारा दुमाला येथील ८७ वर्षीय वृद्धाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच शिबलापूर ४३ वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाल्याचा संशयास्पद असल्याचे समजते.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Coronavirus Sangamner 11 corona infected