लोणी येथील प्रवरा रुग्णालयात सेवेत असलेले दोन करोना पॉझिटिव्ह
Coronavirus/राहता: लोणी येथील प्रवरा रुग्णालयातील सेवेत असलेले दोन जणांचा करोना तपासणी अहवाल काल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये लोणी खुर्द येथील परिचारिकेचा समावेश आहे. तर दाढ बुद्रुक येथील एक व्यक्ती आहे.
सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार प्रवरा रुग्णालयातील एक परिचारिका करोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. ती लोणी पिंपरी निर्मळ परिसरातील रहिवासी असून तेथे लोकवस्ती नसल्याने तेथे प्रतिबंधक क्षेत्र करण्याची आवश्यकता नव्हती. या परिचारिकेच्या कुटुंबातील संपर्कातील चार व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
तसेच दाढ बुद्रुक येथील रहाणारी प्रवरा रुग्णालयात नोकरीस असणारी एक व्यक्ती करोनाबाधित आढळून आली आहे. या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
२१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. लोणी परिसरात रुग्णांचे प्रमाण कमी प्रमाणात आढळून आले आहे. नागरिकांनी सूचनांचे व नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासन करीत आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Coronavirus rahata pravara hospital loni two corona infected