Coronavirus News: अकोले तालुक्यात आज पाच करोनाबाधित
अकोले | Coronavirus News: अकोले तालुक्यात आज अॅटीजेन चाचणीत पाच करोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये विठा, नवलेवाडी, निम्ब्रळ, चास पिंपळदरी या गावांचा समावेश आहे. तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ६६० इतकी झाली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात विठे येथील ४५ वर्षीय महिला, नवलेवाडी येथे ६० वर्षीय पुरुष, निम्ब्रळ येथे ४० वर्षीय पुरुष, चास पिंपळदरी येथे २४ वर्षीय तरुण, ४५ वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आले आहेत. अकोले तालुक्यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत १०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज अकोले तालुक्यातील १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Web Title: Coronavirus News Akole Taluka 5 patient incresed