Coronavirus: करोनाग्रस्त महिलेन केली रुग्णालयातच आत्महत्या
मुंबई: मुंबईतील नायर रुग्णालयातील ही घटना आहे. करोनाग्रस्त असलेल्या एका २९ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. १५ एप्रिलच्या मध्यरात्री या महिलेने रुग्णालयातील बाथरूममध्ये ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आग्रीपाडा पोलिसांत याची नोंद झाली असून पुढील तपास सुरु आहे.
ही महिला वरळीची रहिवासी होती. नायर रुग्णालयात वार्ड क्र. २५ मध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. करोनाची लागण होण्याअगोदर सदर महिलेला दम्याचा आजार होता अशी सूत्रांकडून माहिती कळते.
दरम्यान मुंबईत गेल्या २४ तासांत आणखी २०४ नवे रुग्ण सापडले आहे. ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एकूण आकडा १११ वर पोहोचला आहे. तर एकूण करोनाबाधित १७५३ झाला आहे. २३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
Website Title: Coronavirus ladies sucide case