महिलेला बलात्काराची धमकी देत लुटले, सशस्त्र दरोडा
श्रीगोंदा: श्रीगोंदा शहरातील भोळे वस्ती परिसरात मंगळवारी रात्री एका आदिवासी महिलेच्या घरावर सात जणांनी दरोडा टाकला. महिलेला तलवारीचा धाक धाकवत शारीरिक अत्याचार करण्याची धमकी देऊन चार हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन छडा लावण्यासाठी त्यांनी श्रीगोंदा येथे तळ ठोकला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, भोळे वस्ती शिवारात राहणाऱ्या एका महिलेच्या घरात घुसून दरोडा टाकला. यावेळी महिलेला तलवारीचा धाक दाखविला व शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ३ हजार किमतीचे दागिने आणि एक हजार रुपयाचा मोबाईल चोरून नेला. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी महिलेच्या जबाबानुसार फिर्याद दाखल केली.
सदर महिला जखमी असून तिला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार श्रीगोंद्यात तळ ठोकून आहेत. चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Website Title: Latest News Robbery threatened with rape