अकोले करोना ब्रेकिंग: तालुक्यात आज पाच बाधित आढळले
Coronavirus/अकोले: अकोले तालुक्यात आज पाच करोनाबाधित आढळून आले आहे. अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाले आहे. त्यामुळे तालुक्याची संख्या ६३ झाली आहे.
अकोले शहरातील परखतपूर रोडवरील बाधिताच्या संपर्कातील १४ वर्षीय मुलगीला करोनाची लागण झाली आहे तर बहिरवाडी येथील ३२ वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगी व २४ वर्षीय तरुण आढळून आले आहेत. तसेच कळंब येथील ३४ महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असे पाच जण आज आढळून आले आहेत.
दरम्यान आज सकाळी सात रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे ४६ जण करोनामुक्त झाले तर २ मयत व सध्या १५ जणांवर उपचार सुरु आहेत.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Coronavirus Akole five corona infected