अहमदनगर जिल्ह्यात आज दोन रुग्ण आढळले तर १३ जण करोनामुक्त
Coronavirus/अहमदनगर: आज सायंकाळी अहवाल प्राप्त झाले असून त्यात दोन नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर जिल्हातील १३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
श्रीगोंदा येथील वयोवृद्ध पती वय ७०, पत्नीला वय ६५ करोनाची लागण झाली आहे. काल राशीन येथे आढळून आलेल्या बाधित रुग्णाच्या संपर्कात ते आले होते. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याची एकूण करोना बाधित संख्या २७८ वर पोहोचली आहे.
आज जिल्ह्यातील १३ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात संगमनेरमधील ७, राहतामधील ३, मनपा ०२ आणि नगर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोना मुक्तांची संख्या २३३ झाली आहे. जिल्ह्यात सध्या केवळ ३४ जण उपचार घेत आहेत ही अहमदनगर जिल्ह्यासाठी दिलासादायक वृत्त आहे.
Website Title: Coronavirus Ahmednagar corona updates today