अकोले तालुक्यात कोरोनाचा आठवा बळी तर करोनाचे तिसरे शतक
अकोले | Akole: अकोले तालुक्यात करोनाच्या एकूण संख्येने तिसरे शतकाचा टप्पा पार केला आहे. हिवरगाव आंबरे येथील ६४ वर्षिय पुरूषाचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात आैरंगपुर येथील एक बाधित आढळून आला आहे. एकुण रुग्णसंख्याने तिसरे शतक पूर्ण केले असुन एकुण संख्या झाली ३००.
अकोले तालुक्यातील हिवरगाव आंबरे येथील ६४ वर्षीय पुरुषाचा १३ ॲगस्ट रोजी कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला होता. त्याच्या संगमनेर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरु असताना आज सोमवार दि १७ ॲगस्ट रोजी सकाळी निधन झाले आहे. या रुपाने तालुक्यातील कोरोनाचा ८ वा बळी गेला आहे. तर. सकाळी खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात अैरंगपुर येथील ४५ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
तालुक्यातील एकुण संख्या ३०० झाली आहे. त्यापैकी १९८ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत ९४ व्यक्तीवर उपचार सुरू आहे तर ८ व्यक्ती मयत झाले आहे.
अलताफ ईस्माईल शेख संपर्क (७३८७०२०५९७) पञकार, अकोले
Web Title: Corona News Akole taluka one death