Home अहिल्यानगर पुत्रप्रेमापोटी तहसीलदार बापाने पुरवल्या कॉपी, बारावीच्या परीक्षेत घडला प्रकार

पुत्रप्रेमापोटी तहसीलदार बापाने पुरवल्या कॉपी, बारावीच्या परीक्षेत घडला प्रकार

Breaking News | Ahilyanagar : बारावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याची घटना समोर आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना नायब तहसीलदाराला रंगेहाथ पकडण्यात आले.

Copies provided by Tehsildar father out of filial love

पाथर्डी: अहिल्यानगरमध्ये बारावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याची घटना समोर आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना नायब तहसीलदाराला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर घडली आहे. या घटनेमुळे परीक्षा केंद्रावर एकच खळबळ उडाली. कॉपी पुरवतानाचा नायब तहसीलदाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नायब तहसीलदाराचे नाव अनिल तोडमल आहे.

नायब तहसीलदार अनिल तोडमल यांचा मुलगा बारावीत आहे. सध्या बारावीची परीक्षा सुरु आहे. अशातच मुलाला मदत म्हणून नायब तहसीलदार पाथर्डीमधील बारावीच्या परीक्षा केंद्रावर पोहोचले. पेपर सुरु झाल्यानंतर त्यांनी मुलाला कॉपी देण्याचा प्रयत्न केला. परंतु, याचवेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तहसीलदार  स्वत:च्याच मुलाला कॉपी पुरवत असल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी या परीक्षा केंद्रावर ही घटना घडली असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परीक्षा केंद्र गाठले. आता संबंघित नायब तहसीलदार अनिल तोडमल यांच्यावर आता काय कारवाई केली जाणार आता याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Copies provided by Tehsildar father out of filial love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here