Home पुणे शिवशाही बसमधील बलात्कारातील आरोपीला अटक

शिवशाही बसमधील बलात्कारातील आरोपीला अटक

Breaking News | Pue Rape Case:  शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार, आरोपीला दत्तात्रय गाडे याला शिरूरमधून अटक.

Rape accused in Shivshahi bus arrested

पुणे : पुणे पोलिसांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर दत्तात्रय गाडेला पुण्यात आणण्यात आलं आहे. दत्तात्रय गाडे यानं मंगळवारी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास  26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता. ही धक्कादायक घटना स्वारगेट बसस्थानकात घडली होती.  दत्तात्रय गाडेला शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून पकडण्यात आलं आहे.

पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी 100 पोलिसांचा ताफा, डॉग स्कॉड गुनाट गावात दाखल झालं होतं. दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पोलिसांनी 13 पथकं तयार केली होती. पुणे पोलिसांनी गाडे याला शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून पकडण्यात आलं आहे.  पोलिसांना आरोपी सापडला आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे.

शिरूर तालुक्यातील गुणाट या गावांमध्ये रात्री दीडच्या सुमारास पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु असताना दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली आहे. Dog squad च्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत होते.

दत्तात्रय गाडे बाराच्या सुमारास याच गावातील त्याच्या नातेवाईकांच्या घरी तोफ पाण्याची बाटली मागण्यासाठी गेला होता. पाण्याची बाटली घेतल्यानंतर त्याने जे काही मी केलं त्याचा मला पश्चाताप झाला आहे, असं दत्तात्रय गाडे म्हटल्याची माहिती आहे.  मला पोलिसांना सरेंडर व्हायचं आहे असा बोलून परत निघून गेला होता.

दत्तात्रय गाडे पाणी घेऊन गेल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केली. गाडे याच्या अटकेमध्ये गुनाट गावातील पोलीस पाटील आणि ग्रामस्थ यांचं मोठं सहकार्य पोलिसांना लाभलं. गाडे याला पोलिसांनी स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिलं असून याबाबत अधिक तपास त्यांच्याकडून करण्यात येईल.

Web Title: Rape accused in Shivshahi bus arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here