LockDown: राज्यात लॉकडाऊन उठविणार का मुख्यमंत्री साधणार संवाद

मुंबई | Lockdown: राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णसंखेत घट होताना दिसत आहे. याच पार्शभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रविवारी रात्री ८.३० वाजता सोशियल मेडीयाद्वारे संवाद साधणार आहेत. कोरोना रुग्ण संख्या, लॉकडाऊन, लसीकरण याबाबत विविध विषयांवर मुख्यमंत्री संबोधीत करणार आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. दुसऱ्या लाटेत तरुण वर्गाला मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाला. आता तिसरी लाटेत बालके संसर्ग बाधित होऊ शकतात असे तज्ञांचे मत आहे. यामुळे राज्य सरकार लॉकडाऊन हटविणार का: याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच राज्यात लसीचा तुटवडा जाणवत आहे याबाबत मुख्यमंत्री संवाद साधण्याची शक्यता आहे,
दरम्यान ठाकरे सरकार १ जूनपासून लॉकडाऊन उठाविण्येच्या प्रक्रियेला सुरुवात करेल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडली जातील, गेल्या काही दिवसांपासून दुकाने बंद आहेत. व्यापारी वर्ग प्रचंड नाराज आहे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बार उघडण्याची शक्यता आहे. तसेच जिल्हाबंदी कधी उठवायची ही परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.
Web Title: CM will discuss whether to lift the lockdown in Maharashtra

















































