Bribe: बालविकास प्रकल्प अधिकारी लाच घेताना एलसीबीच्या ताब्यात
Nevasa Bribe Case: बालविकास प्रकल्प अधिकारी ४५ हजाराची लाच घेताना अहमदनगर एलसीबी विभागाच्या जाळ्यात.
नेवासा: नेवासा पंचायत समितीतील बालविकास प्रकल्प अधिकारी ४५ हजाराची लाच घेताना अहमदनगर एलसीबी विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. भाडेतत्वावर लावलेल्या चार चाकी वाहनाचे बिल अदा करण्याकरीता तक्रारदाराकडून लाच एलसीबी अधिकाऱ्यांनी सापळा लावून ताब्यात घेतले आहे. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादीत म्हटले की फिर्यादीचे चारचाकी वाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लावण्यात आले होते. सदर वाहनाचे बिल एक लाख १४ हजार २६१ रुपये मंजूर करून तक्रारदार याचे बँक खात्यात जमा करण्यासाठी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी सोपान सदाशिव ढाकणे यांनी तक्रारदार यांचेकडे ५० हजार रुपयांची मागणी केली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून 23 जून रोजी लाच मागणी पडताळणीमध्ये आरोपी बाल विकास प्रकल्प अधिकारी सोपान ढाकणे याने पंचायत समक्ष ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांनी पथकासह सापळा लावून त्याला लाच (Bribe) घेताना पकडले.
Web Title: Child development project officer arrested by LCB while taking bribe